अक्कलकोट प्रतिनिधी श्रीशैल गवंडी तेज न्यूज
अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सालाबादाप्रमाणे कोजागरी पौर्णिमा मोठ्या भक्तीभावाने व अपार श्रध्देने साजरी करण्यात आली. सायंकाळी ७ वाजता देवीजींच्या स्थापना मंडप द्वाराची विधीवत पुजा करुन द्वार उघडण्यात आले.
यानंतर पुरोहित मंदार महाराज पुजारी यांच्या अधिपत्याखाली पुरोहितांच्या मंगलमय मंत्रोच्चारात मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश मालक इंगळे यांचे सुपूत्र प्रथमेश मालक इंगळे यांच्या हस्ते विधिवत लघुरुद्र करुन देवीस महानैवेद्य व कोजागरी पौर्णिमेस विशेष मान असणारे मसाला दुध प्रसाद दाखविण्यात आले. यानंतर मंदिर समितीच्या वतीने प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते दुध प्रसाद वाटप करण्यात आले. हजारो स्वामी भक्तांनी याप्रसंगी या दुध प्रसादाचा लाभ घेतला.
यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, गिरीश पवार, तुषार मोरे, ओंकार महाडीक, सागर गोंडाळ, प्रसाद सोनार,दादा सावंत, रमेश शिंदे, अविनाश क्षीरसागर, संजय बडवे, गिरिश पवार, विपूल जाधव, स्वामीनाथ लोणारी आदिंसह हजारो भाविक उपस्थित होते.

