पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे तेज न्यूज
महावितरणतर्फे जिल्ह्यातील सर्व विभागीय कार्यालयात व प्रत्येक तालुक्यातील महावितरण कार्यालयात दि.२१ आक्टोबर रोजी ग्राहक तक्रार निवारण दिनाचे आयोजन केले असल्याची माहिती अ.भा. ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास व महावितरणचे अधिक्षक अभियंता सुनिल माने यांनी दिली.
वीज ग्राहकांच्या विविध प्रकारच्या तक्रारी निवारण्यासाठी महावितरणतर्फे दर महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी "ग्राहक तक्रार निवारण दिनाचे" आयोजन करण्यात येते. त्याप्रमाणे २१ आक्टोबर रोजी जिल्ह्यातील पंढरपूर, बार्शी,अकलूज, सोलापूर शहर व सोलापूर ग्रामीण* अशा सर्व विभागीय कार्यालयांमध्ये व प्रत्येक तालुक्यातील महावितरण कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी १ वा.पर्यंत ग्राहकांनी उपस्थित राहून आपल्या तक्रारी मांडून त्यांची सोडवणूक करून घ्यावी.
यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता,उपकार्यकारी अभियंता,सहा.अभियंता हे अधिकारी समक्ष उपस्थित राहून तक्रारी,अडचणी,समस्या सोडविणार आहेत.तरी प्रत्येक तालुक्यातील महावितरण कार्यालयात सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांनी आपल्या अवाजवी बील,सरासरी बील आकारणी, वीज बिल वेळेत न मिळणे,मीटर रीडिंग वेळेत न घेणे,कनेक्शन वेळेत न मिळणे,योग्य दाबाने वीजपुरवठा न होणे,वारंवार वीजपुरवठा खंडित होणे,नविन मीटर वेळेत न मिळाल्यामुळे ग्राहकांना शेतकरी ग्राहकांना वेळेत डी.पी.बदलून न मिळणे,सोलर सिस्टीम अशा कोणत्याही स्वरुपातील ग्राहकांनी लिखित तक्रार अर्जासह उपस्थित राहावे असे आवाहन अ.भा.ग्राहक पंचायतीचे प्रांत सहसचिव दीपक इरकल,सदस्य विनोद भरते,सुभाष सरदेशमुख, जिल्हा उपाध्यक्ष विनय उपाध्ये,जिल्हा सचिव सुहास निकते, सहसचिव दीपक भंडारकवठेकर,जिल्हा महिला प्रमुख सौ.माधुरी परदेशी, जिल्हा सदस्य संभाजी लंगोटे, प्रा. भीष्माचार्य चांदणे, अण्णा ऐतवाडकर पांडुरंग अल्लापूरकर, पंढरपूर तालुका अध्यक्ष नंदकुमार देशपांडे,उपाध्यक्ष प्रशांत माळवदे, सचिव महेश भोसले,यांनी केले आहे.

