पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
भारत सरकार मान्यता प्राप्त राष्ट्रीय स्वयंसेवी संस्था महाराष्ट्र (भारत) या सामाजिक संस्थेच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रो. डॉ. दत्तात्रय काळेल यांची नुकतीच निवड राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संजय कांबळे, संस्थेचे सल्लागार एडवोकेट मा. प्रभाकर शेवाळे, राष्ट्रीय संघटक डॉ. गोरख साठे तसेच संस्थेचे मार्गदर्शक महाराष्ट्र शासनाचे उच्च शिक्षण विभागाचे माजी संचालक व कुलगुरू डॉ.एस एन पठाण व महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघाचे अध्यक्ष डॉ. आबासाहेब देशमुख यांनी केली आहे.
संस्थेचे सामाजिक कार्य भारतातील 12 राज्यांमध्ये सुरू आहे. त्यामध्ये आरोग्य शिबिर घेणे, वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे घेणे व देशभरामध्ये सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी विविध स्वरूपाचे कार्यक्रम घेणे तसेच विविध शैक्षणिक संस्था व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना गुणवत्तेवर आधारित प्रेरणा मिळावी म्हणून विविध पुरस्कार देणे अशा प्रकारे कार्य केले जाते.
डॉ. दत्तात्रय काळेल यांचे सामाजिक शैक्षणिक कार्य पाहता त्यांची महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. डॉ. काळेल हे खिलारवाडी ता. सांगोला येथील सुपुत्र आहेत. तसेच ते सध्या रयत शिक्षण संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय माढा येथे प्रोफेसर व राज्यशास्त्र विभाग प्रमुख तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी आहेत. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
त्यांचे रयत शिक्षण संस्थेचे सचिव मा. किशोरराजे निंबाळकर सहसचिव डॉ. शिवलिंग मेनकुदळे मध्य विभागाचे चेअरमन मा. संजीव पाटील व प्राचार्य प्रो. डॉ.घनश्याम हराळे व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

