मंदीर समितीचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा सत्कार
अक्कलकोट प्रतिनिधी श्रीशैल गवंडी तेज न्यूज
येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे केवळ एक तीर्थक्षेत्र नसून लाखो भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. स्वामी भक्तांसाठी निवास व्यवस्था आणि सुरक्षेचे नियोजन पाहून मनाला खूप समाधान वाटले. स्थानिक पातळीवर देवस्थान समिती सामाजिक कार्यातही अग्रेसर आहे, म्हणून देवस्थान समितीच्या माध्यमातून होणारे सामाजिक कार्य कौतुकास्पद असल्याचे मनोगत महाराष्ट्र शासनातील राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा कॅबीनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केले.
नुकतेच कॅबीनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानला भेट देवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे चेअरमन तथा माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक महेश मालक इंगळे यांनी कॅबीनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद व स्वामींची प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी कॅबीनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील बोलत होते.
पुढे बोलताना कॅबीनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की स्वामी भक्तांची उत्तम व्यवस्था व दर्शन व्यवस्था मंदीर समिती उत्कृष्ट पद्धतीने हाताळत आहे.
देवस्थान समितीच्या सर्वांगीण विकासासाठी शासन नेहमीच देवस्थान समितीच्या पाठीशी राहील असे मनोगतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी प्रथमेश इंगळे, मंदीर समितींचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, मोहन डांगरे, श्रीशैल गवंडी, व्यंकटेश पुजारी, श्रीकांत मलवे, विपूल जाधव, भिमा मिनगले, सचिन हन्नूरे आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.

