भारत कवितके प्रतिनिधी मुंबई कांदिवली तेज न्यूज
कांदिवली येथे भाजपा आमदार योगेश सागर यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत नोटबुक वितरण सोहळा संपन्न झाला.रविवार दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता भारतीय जनता पार्टी वार्ड क्रमांक २० मधील महिला आधार केंद्र,के.डी.कंपाऊंड, गांधी नगर, कांदिवली पश्चिम येथे उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष व नगरसेवक बाळा तावडे यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना मोफत नोटबुक वितरण करण्यात आले.
या प्रसंगी या विभागातील विद्यार्थ्यांनी, महिला, व पुरुष यांनी यांचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला, यावेळी आमचे मुंबई प्रतिनिधी भारत कवितके यांना या वेळी निमंत्रित करण्यात आले होते, मोफत नोटबुक वितरण सोहळा वेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले.
या वेळी उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष व नगरसेवक बाळा तावडे, वार्ड क्रमांक २० चे अध्यक्ष संतोष जाधव, भगवान सिंह, अफजल खान, दिनेश जैस्वाल, पत्रकार भारत कवितके, नूरजहाँ,निलम चौरसिया, प्रवीण पाल, सत्यदेवजी,व इतर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते पुरुष व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, या बाळा तावडे यांनी उपस्थित असलेल्यांना मार्गदर्शन केले.

