अकलूज प्रतिनिधी तेज न्यूज
हिंदी भाषेचे सौंदर्य, सामर्थ्य आणि समृद्ध साहित्यपरंपरा विद्यार्थ्यांना अनुभवता यावी तसेच हिंदी भाषेविषयीची आवड अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज संचलित महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला, यशवंतनगर येथे हिंदी दिनानिमित्त विविध शैक्षणिक व नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन प्रशालेचे मुख्याध्यापक संजय गळीतकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले .
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अजीजखान पठाण वरिष्ठ शाखा प्रबंधक बँक ऑफ इंडिया माळेवाडी, तसेच प्रा. डॉ. निवृत्ती लोखंडे, शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज यांची विशेष उपस्थिती लाभली.
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत महर्षी बाल वाद्य वृंदातील बालचमूंनी आपल्या सुरेल स्वागत गीताने केले.
प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील व रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.
प्रमुख अतिथींचा सन्मान व्यासपीठावर प्रशालेच्या वतीने संपन्न झाला.
प्रशालेतील विद्यार्थिनी भूमिका कारमकर हिने आपल्या भाषणातून हिंदी दिनाचे महत्त्व विशद केले.
हिंदी दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये नैपुण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते व्यासपीठावर संपन्न झाला.
तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये घवघवीत यश मिळवलेल्या सार्थक राऊत, वैभव भोई सर्व खेळाडूं व
सहकार महर्षि करंडक शालेय व महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेमध्ये क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थिनी भूमिका कारमकर व इरीना पठाण या विद्यार्थिनींचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते पार पडला.
प्रशालेतील प्राध्यापक धनंजय देशमुख यांची शालेय शिक्षण विभागाच्या व्यसन जाणीव जागृती जिल्हा समन्वयक पदी निवड झाल्याबद्दल प्रमुख अतिथी अजिज खान पठाण वरिष्ठ शाखा प्रबंधक माळेवाडी यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला
कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते प्रा.डाॅ निवृत्ती लोखंडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना हिंदी ही केवळ अभ्यासक्रमातील विषयाची भाषा न राहता विचार, संवाद आणि अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यम बनली पाहिजे, असे प्रतिपादन केले. भाषेचे ज्ञान हे केवळ गुण मिळविण्यासाठी नसून व्यक्तिमत्त्व विकासासाठीही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेतील साहित्य वाचावे, नवनवीन शब्द आत्मसात करावेत आणि दैनंदिन व्यवहारात भाषेचा आत्मविश्वासाने वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश सोनवणे यांनी केले.

