सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
क्रीडा विभागातर्फे आयोजित विविध वयोगटातील जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा क्रीडा संकुल, सोलापूर येथे नुकतीच पार पडली. या स्पर्धेत वाखरी, पंढरपूर येथील एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विभागीय स्तरासाठी पात्रता मिळवली.
अकरा वर्षाखालील गटात मुलांमध्ये वेदांत जाधव प्रथम, विनायक कुंभार द्वितीय तर जयेश नंदुगडे याने तृतीय क्रमांक पटकावला. मुलींमध्ये एलाक्षी पवार हिने प्रथम क्रमांक मिळवला आहे. चौदा वर्षाखालील गटात मुलांमध्ये तन्मय काळे याने द्वितीय तर स्वस्ति मालवाडकर हिने तृतीय क्रमांक पटकावला. सतरा वर्षाखालील मुलांमध्ये मुस्तफा जमादार याने प्रथम आणि मुलींमध्ये झोया जमादार प्रथम, ज्ञानेश्वरी वानवे द्वितीय व काव्यांजली इंगवले हिने चौथा क्रमांकाने यश संपादित केले.
याशिवाय १९ वर्षाखालील गटात मुलांमध्ये राजवर्धन घुले प्रथम व आर्यांश गजरे द्वितीय तसेच मुलींमध्ये श्रावणी पवाडे प्रथम तर स्वरा चव्हाण हिने तृतीय क्रमांक मिळवला आहे.
यानंतर झालेल्या रोलर हॉकी स्पर्धेत १९ वर्षांखालील गटात एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूलच्या मुले व मुलींच्या दोन्ही संघांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. या सर्व विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. स्केटिंग स्पर्धेसाठी आवश्यक एकाग्रता आणि शारीरिक समतोल याबाबत क्रीडा प्रशिक्षिक मनीष संपागे, पल्लवी पाटील, ऋषिकेश गावडे, रवी ओव्हाळ व वैभव चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी गवळी यांनी संस्थेच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि आगामी विभागीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

