करकंब प्रतिनिधी तेज न्यूज
करकंब येथील श्रीराम गणेशोत्सव तरुण मंडळ सोमवार पेठ येथे सोलापूर ग्रामीण आय.पी.एस.अधिकारी वृक्षप्रेमी अतुल कुलकर्णी, प्रेरणा कट्टी मॅडम. नवले एक.पी.आय. योगेश लंगुटे आदींचा शुभहस्ते गणपती बाप्पांची आरती करण्यात आली.त्यावेळी ते बोलत होते.सुरुवातीला श्रीराम तरुण मंडळाच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.आरती केली
मनोगत व्यक्त करताना अतुल कुलकर्णी यांनी सांगितले की वृक्षारोपण ही काळाची गरज असून प्रत्येक गणेश मंडळांनी वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन चळवळ उभी करावी अतिशय पुण्याचं काम आहे. यामध्ये सर्वांनी पुढाकार घ्यावा असे सांगत सर्व तरुण मंडळाचे मनापासून अभिनंदन केले.तसेच करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीमच्या वतीने श्री संत एकनाथ महाराज पालखी मार्गावर अतुल कुलकर्णी यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी एन्ट्री पॉईंटवर आणि पालखी मार्गावर लावलेल्या झाडांची पाहणी केली.तसेच त्यांच्या परिवाराच्या वतीने लावलेल्या झाडाजवळ जाऊन वाढलेली झाड पाहून सर्व वृक्ष प्रेमींच कौतुक करत शाबासकी दिली.काहीही सहकार्य लागलं तर नक्की कळवा सांगत सर्व करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीमच्या वृक्ष प्रेमींना प्रेरणा दिली.
यावेळी श्रीराम गणेशोत्सव तरुण मंडळाचे विजय दुधाणे,गोरक्षक आकाश धोत्रे, ऋषिकेश पवार, दत्तप्रसाद दुधाणे,अनुप टेके ,श्रीराम टकले,सोहम टकले,यश टकले, गुरुप्रसाद दुधाणे,जयदीप टकले,विजय नलवडे, राजेंद्र करपे सर,तसेच करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीमचे संकल्पक ज्ञानेश्वर दुधाणे हरिश्चंद्र वास्ते अक्षय नगरकर, बापू खारे.चेतन पुरवत.नंदलाल कपडेकर, नागेश खारे,विशाल बोधे,आदी वृक्षप्रेमी तसेच करकंब पत्रकार बांधव करकंबकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

