पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या वतीने थेरी अँड प्रॅक्टिकल एप्लीकेशन ऑफ कॉम्पेक्षण अँड कंसोलीडेशन या विषयावर तज्ज्ञ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. हे व्याख्यान शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आले.
या तज्ज्ञ व्याख्यानासाठी वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सांगली येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक डॉ. अमेय दीपक काटदरे हे प्रमुख तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी मातीच्या कॉम्पेक्षण आणि कंसोलीडेशन प्रक्रियेचे सैद्धांतिक तसेच प्रत्यक्ष अभियांत्रिकी क्षेत्रातील उपयोग याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
व्याख्यानामध्ये मातीची घनता वाढविण्याची प्रक्रिया, कॉम्पेक्षण चे उद्देश व महत्त्व, विविध प्रकारच्या कॉम्पेक्षण पद्धती, मातीतील पाण्याचे प्रमाण, कॉम्पेक्षण वर परिणाम करणारे घटक, तसेच बांधकाम क्षेत्रात योग्य कॉम्पेक्षण न झाल्यास निर्माण होणाऱ्या समस्या याबाबत माहिती देण्यात आली. त्याचबरोबर कंसोलीडेशन प्रक्रिया, मातीतील पाण्याचा निचरा, सेटलमेंट, फाउंडेशन डिझाईन आणि मातीच्या दीर्घकालीन वर्तनावर कंसोलीडेशन चा होणारा परिणाम यांचीही माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
सिव्हिल इंजिनिअरिंगच्या दृष्टीने रस्ते, धरणे, भराव, इमारतींचे पाया, तसेच विविध भू-अभियांत्रिकी प्रकल्पांमध्ये कॉम्पेक्षण आणि कंसोलीडेशन यांचे असलेले महत्त्व विद्यार्थ्यांना उदाहरणांसह समजावून सांगण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गातील सैद्धांतिक ज्ञानाचा प्रत्यक्ष बांधकाम क्षेत्राशी संबंध जोडण्यास मदत झाली.
इंडियन जिओ टेक्निकल सोसायटी (आय जी एस) स्टुडन्ट चाप्टर आणि सेसा अंतर्गत सदर तज्ञ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. श्रीगणेश कदम, विभागप्रमुख डॉ. यशवंत पवार, डॉ. चेतन पिसे (डिन, रिसर्च अँड डेव्हलपमेंट), उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी तसेच प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी मार्गदर्शन केले.
या तज्ज्ञ व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना जिओ टेक्निकल इंजीनियरिंग मधील मूलभूत संकल्पना, प्रत्यक्ष क्षेत्रातील समस्या आणि त्यावरील अभियांत्रिकी उपाययोजना यांचे सखोल ज्ञान मिळाले. अशा तज्ज्ञ व्याख्यानांमुळे विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानाबरोबरच व्यावहारिक कौशल्यांमध्येही वाढ होत असल्याचे मत विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आले.

