पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूरच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील तीन विद्यार्थ्यांची नामांकित ‘मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड’ (MEIL) या कंपनीमध्ये कॅम्पस प्लेसमेंटद्वारे निवड झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक ४ लाख रुपये (४ LPA) इतके आकर्षक पॅकेज मिळाले आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये जुनेद शोदल्ला जमादार, धीरज पांडुरंग घाटे आणि प्रितम सुधाकर लोखंडे यांचा समावेश आहे.
मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड (MEIL) ही अभियांत्रिकी, पायाभूत सुविधा, ऊर्जा, जलसंधारण, सिंचन, वाहतूक आणि विविध मोठ्या प्रकल्पांच्या क्षेत्रात कार्यरत असलेली भारतातील एक आघाडीची पायाभूत सुविधा कंपनी आहे. मोठ्या प्रमाणावर अभियांत्रिकी व बांधकाम प्रकल्पांमध्ये काम करण्याची संधी मिळाल्याने सिव्हिल इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी ही निवड त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
विद्यार्थ्यांना उद्योगाच्या गरजेनुसार तांत्रिक कौशल्ये, संवादकौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास, मुलाखत तंत्र आणि व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांसाठी नियमित प्लेसमेंट ड्राइव्ह, प्री-प्लेसमेंट ट्रेनिंग, मॉक इंटरव्ह्यू, ग्रुप डिस्कशन, तांत्रिक व अॅप्टिट्यूड प्रशिक्षण तसेच नामांकित कंपन्यांशी कॅम्पस भरतीचे आयोजन केले जाते.
महाविद्यालय प्रशासन, प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. विद्यार्थ्यांनी मिळविलेले हे यश महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण आणि उद्योगाभिमुख शिक्षणाची पावती मानली जात आहे.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डॉ. चेतन पिसे, डॉ. भालचंद्र गोडबोले, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डॉ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, डॉ. अनिल निकम, डॉ. शिवशंकर कोंडूरु, सिव्हिल विभाग प्रमुख डॉ. यशवंत पवार, डॉ. सत्यवान जगदाळे, प्रा. अमोल कांबळे तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

