कुडाळ प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर तेज न्यूज
परमेश्वराने भुतलावर एक चमत्कार घडवला आहे तो म्हणजे कोकण.श्री देव परशूरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली कोकण भुमी अर्थात जणू स्वर्गच!
निसर्गाने नटलेल्या या कोकणाला लोककला ही लाभलेली आहे.अशातीलच एक लोककला म्हणजे दशावतार! या दशावतार लोककलेने अनेक कलाकार घडविले.आणि या दशावतार कलेमध्ये स्री भूमिका साकारत आपल्या कलेद्वारे एक वलय निर्माण केले.पदवीधर असुन सुद्धा या कलेमध्ये स्वताला झोकून दिले.दशावतार लोककलेचा प्रचार प्रसार आणि जनजागृती करण्यासाठी स्वतःला झोकून देणारे असे सुप्रसिद्ध सौंदर्यवती ( स्त्री भुमिका साकारणारे) दशावतारी कलाकार कु. यश जळवी यांचा शुक्रवार दिनांक -२१ऑगस्ट २०२६ रोजी जनजागृती सेवा संस्था बदलापूर (रजि.)या संस्थेतर्फे
श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्था रजि चे संस्थापक श्री सहदेव धर्णे, जिव्हाळा सेवाश्रम कुडाळ,चे संस्थापक श्री सुरेश बिर्जे, तसेच जनजागृती सेवा संस्थेचे संस्थापक श्री गुरुनाथ तिरपणकर, शिक्षक, नाटककार श्री संतोष सांगळे यांच्या हस्ते यश जळवी यांच्या निवासस्थानी मानपत्र,शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित श्री सहदेव धर्णे, श्री सुरेश बिर्जे, श्री संतोष सांगळे यांचा जनजागृती सेवा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी यश ची आजी श्रीमती सुरेखा विनायक जळवी, त्याचबरोबर यश ची आई सौ भारती सुशांत जळवी यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.निवास्थानी येऊन सत्कार केल्यानंतर यश,यशची आई,आजी भाराऊन गेले.
संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृती सेवा संस्था ही निःस्वार्थी पणे कार्य करत आहे.आकर्षक मानपत्र बनविण्यासाठी मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे तसेच संस्थेचे खजिनदार दत्ता कडुलकर यांचे विशेष सहकार्य लाभले.

