भाळवणी, ता. पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील सर्व महिला-भगिनींसाठी महिलांच्या सुरक्षिततेबाबत विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम शनिवार, दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता न्यू इंग्लिश स्कूल, भाळवणी येथे आयोजित करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे, पंढरपूर तसेच निर्भया पथकाचे अधिकारी सुप्रिया यादव, निर्मला वाघमारे, शाईन काझी, लखन कुचेकर आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी महिलांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करणार आहेत.महिलांनी आपल्या सुरक्षिततेसंदर्भातील विविध बाबी, कायदेशीर हक्क, अडचणी तसेच आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची काळजी याबाबत माहिती घेण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.असे डगळे यांनी तेज न्यूजला सांगितले.
तरी भाळवणी गावातील सर्व महिला-भगिनींनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन निर्भया पथकाच्या पोलीस निरीक्षक सुप्रिया यादव यांनी केले आहे.


