देगलूर प्रतिनिधी तेज न्यूज
अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष श्री. संतोष मुळे व सौ. संध्याराणी संतोष मुळे यांचे आज देगलूर नगरीत आगमन झाले. विश्व संत श्री नामदेवजी महाराज चौक, देगलूर येथे त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
सर्वप्रथम विश्व संत श्री नामदेवजी महाराज चौक येथे श्री संत नामदेव महाराजांच्या पुतळ्याचे पूजन श्री. व सौ. मुळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर शिंपी समाज देगलूरचे अध्यक्ष श्री. विलास नोमुलवार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन दोघांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी स्वागतासाठी शिंपी समाज अध्यक्ष देगलूर विलास नोमुलवार, दरेवार गणेश, समाज खजिनदार ऍड. सुरेश राचलवार, काशिनाथ नोमुलवार, ओम नोमुलवार, सुदर्शन रामगिरी, अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघाचे सह सचिव नरेश रामगिरी, समीर रेंनगुंटवार, गजानन पोटपल्लेवार, अभय भुरेवार, नारायण (बबन) रायलवार, सतीश सिंगेवार, साईनाथ यन्नंवार, अविनाश रामगिरवार, अरविंद रामगिरवार, नरेश दरबास्तवार, गोपीनाथ संगेवार, बालाजी नोमुलवार (मा. अध्यक्ष), विश्वनाथ राचलवार, राजू सिंगेवार, विनायक रेंनगुंटवार तसेच देगलूर तालुक्यातील व नांदेड जिल्ह्यातील शिंपी समाजाचे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित समाज बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

