पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
चिंचोली भोसे ता पंढरपूर जिल्हा सोलापूर येथील रहिवासी असलेले पत्रकार व सुप्रसिद्ध लेखक अमर कांबळे यांची आत्तापर्यंत 4 पुस्तकं राज्यस्तरीय प्रकाशित झाले आहेत.
तसेच -2013-साला पासून पत्रकार क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या समस्या साठी पत्रकार क्षेत्रातून आवाज उठवून न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे, पत्रकार क्षेत्राशी निगडित साहित्यिक क्षेत्र तसेच साहित्यिक क्षेत्रात लाखो वाचक वर्ग तयार झाला आहे,लेखनाच्या माध्यमातून युवक वर्गामध्ये प्रबोधन केरणे चालू असते,त्यांचे मागीलचं एक पुस्तक.""आईच्या रक्ताची जाणीव"",हे पुस्तक शिवसेना पक्षप्रमुख व मा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते मुंबई मातोश्री येथे प्रकाशन झाले आहे,व एक पुस्तक ""संघर्ष योध्दा "विचाराची भाग धारा -1-पंढरपूर माढा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अभिजित आबा पाटील यांच्या विचारधारेवर आधारित असून त्या पुस्तकाचे प्रकाशन स्व.ता आमदार अभिजित आबा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
अमर कांबळे यांचे अता नवीन एक पुस्तक प्रकाशित होण्याच्या वाटेवर आहे ते म्हणजे भारत देशात प्रथमच सत्य घटनेवर आधारित विद्रोही कादंबरी ""गद्दारांची औलाद""हे पुस्तक प्रकाशन होण्या अगोदरचं पाच देशातील वाचकांपर्यंत पोहचले आहे,या पुस्तकाला भारत देशातील वाचकासह परदेशातील वाचकांनमधून भरपूर प्रतिसाद भेटत आहे व मागणी वाढत आहे, ""गद्दारांची औलाद"या पुस्तकाची अता नुकतीच अमेरिका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये दखल घेऊन नोंद घेण्यात आली आहे,अमर कांबळे हे ग्रामीण भागातील पत्रकार व सुप्रसिद्ध लेखक असल्यामुळे त्यांचे सर्वांना कौतुक वाटत आहे.
पत्रकार क्षेत्र व साहित्यिक क्षेत्र पाहता अंगी समाजसेवेची आस अनेकांच्या अडीअडचणी मध्ये धावून जाणे व मदत करणे या सर्व गोष्टींची सोलापूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात चर्चा होत असते,लाखो वाचकांना वाचनाची आवड निर्माण झाली आहे,व पुस्तकाची वाढती मागणी पाहता व वाचक वर्गातून होत असलेले कौतुक पाहता आनंदी युनिव्हर्स फाउंडेशन (महाराष्ट्र राज्य) यांच्या मार्फत सखोल अभ्यास करून पत्रकार व सुप्रसिद्ध लेखक अमर कांबळे यांना महाराष्ट्र भूषण- 2026- पुरस्कार जाहीर करण्यात आला.
या पुरस्कार वितरण सोहळा वेळी आनंदी युनिव्हर्स फाउंडेशन सचिव गणेश विटकर,, हिंदी सिनेमा अभिनेत्री मुग्धा ठाकूर,, राष्ट्रीय ऑलिम्पिक चॅम्पियन व महाराष्ट्र पोलीस (मुंबई) रेश्मा कुटे, राष्ट्रीय निवेदक व गायक तसेच समाजसेवक गणेश मोधवे, समाजसेविका व सुत्रसंचालीका धनश्री हेरे,व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्र भुषण _2026-(महाराष्ट्र राज्य) पुणे येथे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, पत्रकार व सुप्रसिद्ध लेखक अमर कांबळे हे ग्रामीण भागातील पत्रकार व साहित्यिक असून त्यांना महाराष्ट्र राज्यातील आनंदी युनिव्हर्स फाउंडेशने दखल घेऊन महाराष्ट्र भुषण पुरस्कार देऊन एका ग्रामीण भागातील व्यक्तीला महाराष्ट्रातील मोठा मानाचा पुरस्कार देऊन सन्मान केला,व सन्मानित करण्यात आले त्याबदल,त्यांचे सर्व स्तरांतील मान्यवरांनमधून तसेच जेष्ठांन व युवक वर्ग तसेच महिला वर्ग,वाचक वर्ग या सर्वांन मधून भरभरून कौतुक केले जात आहे. तसेच तेज न्यूज परिवाराने पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


