पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर कोर्टी येथील एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या १६ विद्यार्थ्यांची एचव्हायटी इंजिनिअरिंग, पुणे या नामांकित कंपनीमध्ये कॅम्पस प्लेसमेंटद्वारे निवड झाली आहे. विद्यार्थ्यांना वार्षिक ४ लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये गीतांजली विक्रांत सोनवणे (म्हसवड, ता. माण), रोहित बाळासो खपाले (रोपळे, ता. पंढरपूर), गायत्री बापूराव फुले (चुंडेश्वरवाडी, ता. माळशिरस), शुभम बाळासाहेब जोशी (भाळवणी, ता. पंढरपूर), चेतन लक्ष्मण मासाळ (नंदेश्वर, ता. मंगळवेढा), संतोष मल्लिकार्जुन कोळी (हिंगणी-घाटणे), उदय राजेंद्र कांबळे (फुलचिंचोली, ता. पंढरपूर), आकांक्षा संदीप घोलप (विगडी, ता. कराड), संदेश सुनील सुडके (महमदाबाद-शेटफळ, ता. मंगळवेढा), वैष्णवी राहुल जगताप (सांगोला), श्वेताली संभाजी कोंडुभैरी (मंगळवेढा), सुयश मनोहर घोडके (आंबे, ता. पंढरपूर), सुशांक सुरेश राऊत (सांगोला), ओंकार संभाजी बागल (गादेगाव, ता. पंढरपूर), वैष्णवी धनंजय पाटील (पिंपळनेर, ता. माढा) आणि गीतांजली जगन्नाथ देशमुख (झेंडे गल्ली, पंढरपूर) यांचा समावेश आहे.
या विद्यार्थ्यांची एचव्हायटी इंजिनिअरिंग, पुणे या कंपनीमध्ये कॅम्पस प्लेसमेंटमधून निवड झाल्याची माहिती मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे विभागप्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी दिली.
एचव्हायटी इंजिनिअरिंग ही पुणे येथील अग्रगण्य अभियांत्रिकी कंपनी असून कंपनीची स्थापना १९८९ मध्ये झाली आहे. कंपनीचे मुख्यालय चिंचवड, पुणे येथे आहे. रेल्वे आणि मेट्रो क्षेत्रासाठी अत्याधुनिक मशिनरी, ट्रंकी प्रकल्प तसेच देखभाल व अभियांत्रिकी उपाययोजना पुरविण्याचे काम कंपनी करते. भारतीय रेल्वे व मेट्रो प्रकल्पांसाठी विविध प्रकारच्या यंत्रसामग्रीच्या निर्मितीत कंपनीचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डॉ. चेतन पिसे, डॉ. भालचंद्र गोडबोले, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डॉ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, डॉ. अनिल निकम, डॉ. शिवशंकर कोंडूरु, डॉ. यशवंत पवार, डॉ. सत्यवान जगदाळे, प्रा. अतुल कुलकर्णी तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

