सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
लातूर वाले इंग्लिश स्कूलचे प्राचार्य तथा सदस्य चंद्रशेखर भोगडे यांची वाले इंग्लिश स्कूलमध्ये अखंड व अविरत 50 वर्षे सेवा झाली.
ही 50 वर्षे व इतरत्र 10 वर्षे अशी 6 दशकांची त्यांची सेवा आहे. नुसती वर्षच नव्हे तर या कालावधीत दोन शोधनिबंध, शिक्षण संक्रमणात अनेक लेख, पाठ्यपुस्तक मंडळावर 30 वर्षे सेवा (बालभारती व SCERT), दोन राष्ट्रीय पुरस्कार, शासनाचा राज्य पुरस्कार, हैद्राबाद येथील CIEFL येथे झालेल्या इंग्लिश सेमिनार मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे.
या सर्व कार्याची दखल घेत इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डस् नी त्यांच्या पुस्तकात या विश्वविक्रमाची नोंद घेतली व चंद्रशेखर भोगडे यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. हा विश्वविक्रम चंद्रशेखर भोगडे यांनी आपल्या आईवडिलांना समर्पित केला.
ही गोष्ट लातूरसाठी भूषणावह आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव मकरंद सावे, कोषाध्यक्ष शांतीकुमार कुचेरिया सर्व सदस्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

