पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सीमेवरील जवानांना राख्या पाठवणे हा प्रेरणादायी उपक्रम असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापिका सई शिंदे यांनी केले
पंढरपूर तालुक्यातील कौठाळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलींनी सीमेवर अहोरात्र लढणाऱ्या वीर जवानांसाठी स्वतः आकर्षक राख्या बनवल्या आहेत. देशाचे रक्षण करणाऱ्या सीमेवरील जवानांप्रती व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कौठाळी गावातील युवतींच्या वतीने हा प्रेरणादायी उपक्रम पंधरा वर्षापासून राबविला जात आहे.
मुलींना राख्या बनवण्यासाठी मुख्याध्यापिका सई शिंदे,सरिता साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले.

