भारत कवितके प्रतिनिधी मुंबई कांदिवली पश्चिम तेज न्यूज
बोरिवली मध्ये राष्ट्रीय भटके विमुक्त मुक्ती दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.३१ आगस्ट भटके विमुक्त मुक्ती दिनाचे औचित्य साधून बोरिवली येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
रविवार दिनांक ३० आगस्ट २०२६ रोजी सकाळी ११वाजता बोरिवली येथील फुलपाखरं गार्डन,मागाठाणे स्व.शैलजाताई विजय गिरकर समरसता सभागृह येथे भटक्या विमुक्त समाजातील मान्यवर व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले, सुरुवातीला भारत माता, छत्रपती शिवाजी महाराज, पैलवान मारुती चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिप प्रज्वलन करण्यात आले.सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आले, भटके विमुक्त चे सामुदायिक केंद्रीय गीत गायले गेले.
यावेळी राष्ट्रीय कार्यवाह व प्रमुख वक्ते अनिल फड यांनी सांगितले की," देशाच्या १२ राज्यात हा दिन साजरा करण्यात येतो आहे, संपूर्ण देशातून ३१ आगस्ट १९५२ भटक्या विमुक्त समाजाला मुक्ती मिळाली, उमाजी नाईक आद्य क्रांतिवीर ठरले, भटक्या चा संघर्ष फक्त इंग्रजांशी झाला असे नाही, ईस्ट इंडिया कंपनीशी आपला संबंध आला, व्यवसायातून सुरू झालेला संघर्ष देशभक्ती मध्ये आला.वडार समाज दगडाची पारख असलेला समाज,कुठला दगड कुठे वापरायचा याची माहिती असलेला, रस्ता दाखविणारा धनगर समाज, कलाकृती करणारा भटक्या समाज, मोगला पासून इंग्रजा पर्यंत संघर्ष करणारा भटक्या समाज, जगाला हिंदू धर्माची ओळख करून देणारे भटके विमुक्त होते, आम्हाला आमच्या ओळखीसाठी शासनाकडे भीक मागावी लागते ही आपल्या भटक्या विमुक्ताची शोकांतिका आहे, सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत ४० हजार हून अधिक भटक्या विमुक्त समाजातील लोक होते, देशासाठी भटक्या विमुक्त समाजाचे खूप मोठे योगदान आहे.आजच्या राजकीय, सामाजिक स्थितीत भटक्या विमुक्त समाजाची गळचेपी होते आहे, ओबीसी, मराठा ओबीसी मध्ये आम्ही टिकू शकणार नाही,"
या वेळी चंद्रकांत शिंदे, राजेंद्र गोसावी,निहारिका खोंदले,मंदा फड, श्री कुमार शिंदे, गिरीधर साळुंखे, आदी मान्यवर उपस्थित होते, सूत्रसंचालन गिरीधर साळुंखे यांनी केले.या प्रसंगी आमचे मुंबई प्रतिनिधी भारत कवितके, अर्चना लष्कर, मंगेश शिंगे, गौरी धोत्रे, शिवाजी पिसे, संतोष पिसे, दादा पिसे, मल्हारी लाळगे,सह पुरुष व महिला पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी निहारिका खोंदले यांनी सर्वांचे आभार मानले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
भारत कवितके प्रतिनिधी मुंबई कांदिवली पश्चिम तेज न्यूज
३१ आगस्ट भटके विमुक्त मुक्ती दिनाचे औचित्य साधून बोरिवली येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
रविवार दिनांक ३० आगस्ट २०२६ रोजी सकाळी ११वाजता बोरिवली येथील फुलपाखरं गार्डन,मागाठाणे स्व.शैलजाताई विजय गिरकर समरसता सभागृह येथे भटक्या विमुक्त समाजातील मान्यवर व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले, सुरुवातीला भारत माता, छत्रपती शिवाजी महाराज, पैलवान मारुती चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिप प्रज्वलन करण्यात आले.सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आले, भटके विमुक्त चे सामुदायिक केंद्रीय गीत गायले गेले.
यावेळी राष्ट्रीय कार्यवाह व प्रमुख वक्ते अनिल फड यांनी सांगितले की," देशाच्या १२ राज्यात हा दिन साजरा करण्यात येतो आहे, संपूर्ण देशातून ३१ आगस्ट १९५२ भटक्या विमुक्त समाजाला मुक्ती मिळाली, उमाजी नाईक आद्य क्रांतिवीर ठरले, भटक्या चा संघर्ष फक्त इंग्रजांशी झाला असे नाही, ईस्ट इंडिया कंपनीशी आपला संबंध आला, व्यवसायातून सुरू झालेला संघर्ष देशभक्ती मध्ये आला.वडार समाज दगडाची पारख असलेला समाज,कुठला दगड कुठे वापरायचा याची माहिती असलेला, रस्ता दाखविणारा धनगर समाज, कलाकृती करणारा भटक्या समाज, मोगला पासून इंग्रजा पर्यंत संघर्ष करणारा भटक्या समाज, जगाला हिंदू धर्माची ओळख करून देणारे भटके विमुक्त होते, आम्हाला आमच्या ओळखीसाठी शासनाकडे भीक मागावी लागते ही आपल्या भटक्या विमुक्ताची शोकांतिका आहे, सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत ४० हजार हून अधिक भटक्या विमुक्त समाजातील लोक होते, देशासाठी भटक्या विमुक्त समाजाचे खूप मोठे योगदान आहे.आजच्या राजकीय, सामाजिक स्थितीत भटक्या विमुक्त समाजाची गळचेपी होते आहे, ओबीसी, मराठा ओबीसी मध्ये आम्ही टिकू शकणार नाही," या वेळी चंद्रकांत शिंदे, राजेंद्र गोसावी,निहारिका खोंदले,मंदा फड, कुमार शिंदे, गिरीधर साळुंखे, आदी मान्यवर उपस्थित होते,
सूत्रसंचालन गिरीधर साळुंखे यांनी केले.या प्रसंगी आमचे मुंबई प्रतिनिधी भारत कवितके, अर्चना लष्कर, मंगेश शिंगे, गौरी धोत्रे, शिवाजी पिसे, संतोष पिसे, दादा पिसे, मल्हारी लाळगे,सह पुरुष व महिला पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी निहारिका खोंदले यांनी सर्वांचे आभार मानले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

