सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
ड्रीम फाउंडेशन संचलित ड्रीम आयएएस सेंटर, चाणक्य गुरुकुल आणि ड्रीम कोचिंग क्लास, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनाचे औचित्य साधून 'शिक्षक रत्न पुरस्कार सन्मान सोहळा २०२६' चे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम सोमवार, दिनांक ६ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत श्री सिद्धेश्वर कृषी पर्यटन केंद्र (गजानन महाराज मंदिरा जवळ, सोरेगाव कुमठे रोड, सोलापूर) येथे पार पडणार आहे.
या सोहळ्यात सोलापूर जिल्ह्यातील ११ गुणवंत शिक्षकांना आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि माजी आमदार शिवशरण अण्णा पाटील बिराजदार यांच्यासह विविध मान्यवरांच्या शुभहस्ते 'शिक्षक रत्न' पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, फेटा, शाल, सन्मानपत्र आणि ग्रंथ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
कार्यक्रमाचे संयोजन ड्रीम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष काशिनाथ भतागुणकी करत असून, समन्वयक म्हणून सदाशिव व्होनमाने आणि मार्गदर्शक म्हणून ड्रीम फाउंडेशनचे पदाधिकारी काम पाहत आहेत. तरी या सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९८९०९४८३८८ या क्रमांकावर संपर्क साधावा.


