अक्कलकोट प्रतिनिधी श्रीशैल गवंडी तेज न्यूज
श्री स्वामी समर्थ महाराज हे केवळ एक संत नसून करोडो भक्तांचा श्वास आहेत. 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हा त्यांचा अभयमंत्र आजही संकटकाळी भक्तांना धीर देतो. वटवृक्षाच्या रूपाने स्वामी आजही येथे वास करतात याची प्रचिती येथे आल्यावर येते. अशा या महान स्वामींच्या मंदीरात सेवा करण्याची संधी इंगळे कुटूंबियांच्या माध्यमातून परंपरेप्रमाणे चेअरमन महेश इंगळे यांना लाभली आहे त्यामुळे देवस्थान समितीच्या माध्यमातून स्वामींचा सेवाव्रत निष्ठेने पुढे नेणारे महेश इंगळे यांना भेटून आनंद झाला असल्याचे मनोगत भाजपाचे नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्य व माजी मंत्री बसवराज पाटील यांनी व्यक्त केले.
आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास आमदार बसवराज पाटील यांनी भेट देऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचे व वटवृक्षाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश मालक इंगळे यांनी आमदार बसवराज पाटील यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद व स्वामींची प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी आमदार बसवराज पाटील
बोलत होते. दर्शनानंतर आमदार बसवराज पाटील यांनी मंदिर परिसराची पाहणी करून देवस्थान संचलीत भक्त निवास, तंत्रनिकेतन महाविद्यालय, तसेच रुग्णालय येथील देवस्थानचे व्यवस्थापन व्यवस्थेचे कौतुक केले. याप्रसंगी प्रथमेश इंगळे, रशीद गुत्तेदार, महेश हिंडोळे,
मनोज इंगुले, महेश पाटील, नितीन पाटील, मंदिर समितीचे पदाधिकारी, सेवेकरी व स्वामीभक्त उपस्थित होते.

