पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर येथील उमा शिक्षण संकुलामध्ये 'श्री पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळ' संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रद्धेय, कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे सचिव राजगोपालजी भट्टड यांच्या हस्ते करण्यात आले.
या यावेळी सचिव राजगोपालजी भट्टड यांनी अभिवादनपर मनोगतातून,श्रद्धेय कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक हॉस्पिटलमध्ये अखेरचे श्वास घेत असतानाही बैल पोळ्याच्या सणासाठी त्यांनी शेतकऱ्यांचे बिल काढायला लावले. यावरून ते खरे कर्मयोगी असल्याचा प्रत्यय येतो.असे विचार विशद केले.
संस्थेचे विश्वस्त माजी प्राचार्य डॉ.मिलिंद परिचारक यांनी भावपूर्ण शब्दांमध्ये कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांचे समाज विकासाचे विचार आणि कार्यकर्तृत्व कालातीत आहे.असे प्रतिपादन केले.या कार्यक्रमा प्रसंगी प्रा.डॉ.सर्वगोड एन सी यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे विश्वस्त युवा नेते ॲड.प्रणवजी परिचारक, संस्थेचे विश्वस्त रमेशजी लाड, उमा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धीरजकुमार बाड, उमा शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बागवान सर, संस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. लोखंडे एन एस तसेच उमा शिक्षण संकुलातील प्राध्यापक वर्ग ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून कर्मयोगी श्रद्धेय सुधाकर पंत परिचारक यांच्या समाजसेवा, शिक्षणप्रसार , शेतकरीहित आणि समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या कार्याचे स्मरण करून त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.


