माळशिरस प्रतिनिधी तेज न्यूज
आज पंचायत समिती, माळशिरस येथे देशभक्तीपूर्ण वातावरणात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत.तालुक्याचे सभापती दत्ता भैय्या मगर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी पंचायत समितीचे उपसभापती, सन्माननीय सदस्य, गटविकास अधिकारी तसेच अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या असंख्य स्वातंत्र्यवीरांना विनम्र अभिवादन!
त्यांच्या त्यागातून मिळालेल्या स्वातंत्र्याची जपणूक करत समृद्ध, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी आपण सर्वांनी योगदान देऊया.
स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

