भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
भाळवणी येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स विद्यालयात भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. स्कूल कमिटीचे चेअरमन, शिवसेना जिल्हा प्रमुख, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती सदस्य तथा रयत शिक्षण संस्था, मध्य विभाग, सातारा समन्वय समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी ई बा मुलाणी, वामन भाऊ सराटे,दिपक गवळी, उपसरपंच नितीन शिंदे,विद्यालयाच्या प्राचार्य के. डी. शिंदे, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य, पदाधिकारी, पालक, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यालय परिसरात देशभक्तीपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचे महत्त्व, देशाप्रती असलेली जबाबदारी आणि राष्ट्रहिताची जाणीव याबाबत मार्गदर्शन केले.कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

