मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
महाराष्ट्रातील नवोदित कलाकारांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी 'आर्यारवी एंटरटेनमेंट' आयोजित 'राज्यस्तरीय भव्य एकपात्री अभिनय स्पर्धा 2026'चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेत्यांना रोख पारितोषिके तसेच 'आर्यारवी एंटरटेनमेंट'च्या आगामी लघुपटांमध्ये काम करण्याची विशेष संधी मिळणार आहे.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव, 150 हून अधिक पत्रकारांचा गौरव, राज्यस्तरीय कराओके गायन स्पर्धा आणि सेलिब्रेटी क्रिकेट मॅच अशा यशस्वी उपक्रमांनंतर संस्थेने या राज्यस्तरीय अभिनयाचा मंच खुला केला आहे.
स्पर्धेची पारितोषिके:
• प्रथम क्रमांक: ₹7,001/- + स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र
• द्वितीय क्रमांक: ₹5,001/- + स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र
• तृतीय क्रमांक: ₹3,001/- + स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र
(प्रत्येक सहभागी स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.)
महत्त्वाचे नियम व अटी:
स्पर्धकांसाठी अभिनयाचा कालावधी 5 ते 7 मिनिटे निश्चित करण्यात आला असून सामाजिक, विनोदी, ऐतिहासिक किंवा कौटुंबिक विषयांवर मराठी, हिंदी अथवा इंग्रजी भाषेत सादरीकरण करता येईल. राजकीय, धार्मिक किंवा आक्षेपार्ह विषयांवर बंदी घालण्यात आली असून आवश्यक वेशभूषा व साहित्य स्पर्धकांना स्वतः आणावे लागेल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
नोंदणी व संपर्काची माहिती:
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 5 सप्टेंबर 2026 पर्यंत आपले नाव, मोबाईल नंबर, पत्ता, एकपात्रिकेचा विषय व कालावधी व्हॉट्सॲपवर पाठवणे अनिवार्य आहे. स्पर्धेची तारीख, वेळ व ठिकाण 7 दिवस आधी कळवले जाईल. अधिक माहिती व नोंदणीसाठी निखिल मोहन कटारे (9821483932), अविनाश बळवंत राऊत (7977627430) किंवा महेश्वर भिकाजी तेटांबे (9082293867 / 8879810298) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

