पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
कामानिमित्त सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, पंढरपूरचे सुनील तेलगरे तसेच सहाय्यक सहकारी अधिकारी, पंढरपूरचे विलास घोडके यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी सदिच्छा भेट घेतली.
यावेळी नागेश फाटे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व शाल देऊन दोन्ही अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. भेटीदरम्यान सहकार क्षेत्राशी संबंधित विविध विषयांवर मनमोकळी चर्चा करण्यात आली. सहकारी संस्थांचे कामकाज, सभासदांचे हित आणि सहकार क्षेत्राच्या विकासाबाबत यावेळी विचारविनिमय झाला.
या प्रसंगी विठ्ठल अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे मॅनेजर संग्राम कापसे उपस्थित होते.
सहकार क्षेत्रातील विविध विषयांवर सकारात्मक चर्चा घडून आल्याने ही सदिच्छा भेट महत्त्वपूर्ण ठरली.

