बारामती प्रतिनिधी तेज न्यूज
नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीए तर्फे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेत पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खडकी या छोट्याशा खेडेगावातील श्रावणी कृष्णा कुदळे हिने 720 पैकी 710 गुण मिळवून चमकदार कामगिरी दाखविली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेऊनही मोठे यश संपादन करता येते हे श्रावणीने दाखवून दिले आहे. श्रावणी नीट परीक्षेत देशात पाचवी तर मुलींमध्ये देशात पहिली आहे.
श्रावणीचे इयत्ता पहिली ते पाचवीचे शालेय शिक्षण दौंड तालुक्यातील गोपाळवाडी चोरमले वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण माळेगाव येथील शारदाबाई पवार विद्यानिकेतन झाले. वर्षभर मोबाईलचा वापर तिने केला नाही.तसेच समाज माध्यमांपासून दूर राहिल्याने तिला हे यश मिळाले आहे.
दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशील शिक्षक कृष्णा कुदळे यांची कु. श्रावणी जयश्री कृष्णा कुदळे ही कन्या असून, अत्यंत उल्लेखनीय यश संपादन तिने केले आहे. तिचे मनापासून कौतुक..!

