पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे तेज न्यूज
वारकरी भक्तांची सेवा हीच ईश्वर सेवा फिनोलेक्स पाईप्स अँड फिटिंग चे मालक प्रकाश छाब्रिया यांच्या संकल्पनेतून कंपनीने गेले अनेक वर्षे आषाढी वारीत कंपनीच्या माध्यमातून पंढरपुरात सक्रिय आहे. या आषाढी यात्रे 2026 ला पंढरपूर नगर परिषद पंढरपूर ला दीड हजार देशी झाडे, व स्वच्छ पंढरपूर सुंदर पंढरपूर या साठी 100 मोठे डस्टबिन कंपनीच्या माध्यमातून देण्यात आले आहेत
स्वच्छ पंढरपूर हरित पंढरपूर मोहिमे अंतर्गत पंढरपूर नगरपरिषदे दीड हजार वृक्षांची मागणी करण्यात आली होती त्याचबरोबर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ पंढरपूर सुंदर पंढरपूर अंतर्गत आरोग्य विभागाला 100 मोठे 120 लिटरचे डस्टबिन ची मागणी नगरसेवक सौरभ थिटे यांनी केली होती.
फिनोलेक्स पाईप्स अँड फिटिंग्ज व मुकुल माधव फाउंडेशन यांनी आज नगर परिषदेकडे दीड हजार देशी वृक्ष व 100 डस्टबिन फिनोलेक्स पाईपस अँड फिटिंग चे अनिरुद्ध सरनाईक , प्रविण सिंग यांनी आज नगरपरिषदेकडे सुपूर्द केले.
नगरसेवक सौरभ थिटे व हरिकृपा डिजिटल चे श्रीराम बडवे यांच्या माध्यमातून व पाठपुराव्यातून उपलब्ध होत असल्याचे व गेली दहा ते बारा वर्ष कंपनी वारकऱ्यांसाठी विविध सेवा उपक्रम राबवत असल्याचे फिनोलेक्स कंपनीचे अनिरुद्ध सरनाईक यांनी सांगितले
भक्ती सागर 65 एकर या ठिकाणी मुख्याधिकारी महेश रोकडे साहेब, उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, पक्षनेते भागवत बडवे, माजी नगराध्यक्ष व नगरसेवक लक्ष्मणराव शिरसाट पाणीपुरवठा सभापती अमोल डोके, आरोग्य सभापती राजू सर्वगोड, नगरसेवक ॲड.सुनील वाळूजकर, नगरसेवक सौरभ थिटे, नगरसेवक विनायक संगीतराव नगरसेवक लखन चौगुले, नगरसेवक धर्मराज घोडके, समाजसेवक शरद बापू माने , गणेश शिंदे नाईक, सागर बाबा तारापूरकर, माजी नगरसेवक संग्राम अभ्यंकर, विक्रम शिरसाट, विवेक परदेशी, हरीकृपा डिजिटल चे श्रीराम बडवे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये देशी वृक्ष व 100 डस्टबिन सुपूर्द करण्यात आले. व वृक्षारोपण कार्येक्रम संपन्न झाला.
यावेळी मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी फिनोलेक्स कंपनीचे आभार मानले व असे सहकार्य कायम राहावे यासाठी विनंती केली
यावेळी नगरसेवक सौरभ थिटे म्हणाले गेले दहा-बारा वर्ष फिनोलेक्स कंपनी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम पंढरपूर शहरांमध्ये व वारिकाळात राबवले जात आहेत वारी काळामध्ये पोलिसांना व वारकऱ्यांना रेनकोट वाटप छत्र्या वाटप पिशव्या वाटप असे उपक्रम कंपनीच्या माध्यमातून होत असतात ते असेच पुढे सुरू राहून कंपनीचे आभार मानण्यात आले.
पोलिसांना 10 हजार रेनकोट वाटप
फिनोलेक्स पाईप्स ॲण्ड फिटिंग कंपनीचे मालक श्री प्रकाश छाब्रिया साहेब यांच्या सुंदर संकल्पना पोलिसांची सेवा म्हणजेच वारकरी भाविकांचे सेवा व ईश्वर सेवा ही संकल्पना मनामध्ये धरून गेली अनेक वर्षे पंढरीच्या आषाढी यात्रे करता येणाऱ्या वारकरी भाविकांसाठी पोलीस बांधवांसाठी मदत स्वरूपात बरेच उपक्रम राबवले जातात त्यातीलच एक म्हणजे पंढरपूर मधील सोलापूर ग्रामीण पोलीस यांना दहा हजार उच्च प्रतीच्या रेनकोटचे वाटप केले जाते.
याही वर्षी पंढरपूर हरिकृपा डिजिटल प्रोप्रायटर श्रीराम बडवे यांच्या सहकार्यातून पंढरपूर पोलीस स्टेशन येथे फिनोलेक्स कंपनीचे अनिरुद्ध सरनाईक, प्रवीण सिंग, श्रीराम बडवे, नगरसेवक सौरभ थिटे यांच्या हस्ते दहा हजार पर्यन्त रेनकोट वाटप करण्यात आले. यावेळेस पंढरपूर शहर चे पीआय मुजावर, पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी कंपनीचे आभार मानले व उपस्थित सर्व पोलीस बांधवांनी आनंद व्यक्त केला व सर्व कंपनीचे ऋण व्यक्त केले.

