भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
भाळवणी, ता. पंढरपूर : आषाढी एकादशीच्या निमित्ताने भाळवणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिंडी सोहळ्याचे भक्तिमय वातावरणात उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून टाळ-मृदंगाच्या गजरात "ज्ञानोबा-तुकाराम"च्या जयघोषात दिंडी काढली. संतांच्या अभंगांचे गायन, हरिनामाचा गजर आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
शाळेच्या मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची परंपरा, संतांचे विचार, एकात्मता, शिस्त आणि संस्कार यांचे महत्त्व समजावे या उद्देशाने या दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, संस्कार आणि सामाजिक ऐक्याची भावना अधिक दृढ झाली. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत शाळेच्या या अभिनव उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
बालदिंडी सोहळ्याचा सांगता समारंभ...
शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अमोल शिंदे यांनी श्री च्या वाढदिवसानिमित्त सर्व मुला मुलींसाठी मस्त स्नेह भोजनाचे आयोजन केले, तसेच सामाजिक कार्यकर्ते वैभव राजेंद्र लिंगे यांनी सर्व मुला मुलींसाठी स्टील पाणी बॉटल चे वाटप केले. पालखी सोहळ्यातील अंगत पंगत खूप छान झाली . खऱ्या खु ऱ्या वारकऱ्यांना मिळालेला महाप्रसाद .यावेळी दिंडी सोहळ्यात सहभागी झालेल्या विध्यार्थीचा आनंद चेहऱ्यावर दिसत होता.

