पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या शाखेत विमा सप्ताह तसेच एलआयसीच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त सरपंच मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्य शाखाधिकारी अरुण मिरगे यांनी भाळवणी गावचे सरपंच रणजित जाधव यांचा पुष्पगुछ देऊन सत्कार केला.
यावेळी शाखाधिकारी मिरगे यांनी सांगितले की, “सरपंच म्हणजे गावगाड्यातील मार्गदर्शक, समन्वयक आणि समाजाला दिशा देणारा लोकप्रतिनिधी आहे. एलआयसीच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या सरपंच मेळाव्यात आपल्याशी हितगुज साधण्याची संधी मिळाली, याचा आनंद आहे.”
मेळाव्यात एलआयसीच्या विविध सामाजिक व विमा योजनांची माहिती देण्यात आली. यामध्ये बिमा ग्राम, स्कूल बिमा, जीवन लक्ष्य आदी योजनांची माहिती देऊन ग्रामीण भागातील नागरिकांना विमा संरक्षणाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच ग्रामपातळीवर विमा योजनांचा अधिकाधिक प्रसार करण्याबाबत उपस्थितांशी चर्चा करण्यात आली.
या कार्यक्रमास सौ. अश्विनी बिराजदार, विकास अधिकारी बी एस चौगुले विमा प्रतिनिधी प्रशांत माळवदे यांच्यासह विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, विमा प्रतिनिधी व एलआयसीचे कर्मचारी उपस्थित होते.

