करकंब प्रतिनिधी तेज न्यूज
ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय शाखा करकंब यांचे वतीने प्रतिवर्षाप्रमाणे ड्रीमसीटी येथील शाखेत पंढरपूर सेंटरच्या मुख्य संचालिका बीके उज्वला बहेनजी करकंब शाखेच्या बीके अनिता बहेनजी स्वाती बहेनजी शिवानी बहेनजी ,सुरेखा शेळके,श्रध्दा शेळके, ज्ञानेश्वर दुधाणे, सुनील दुधाणे तसेच साधक यांच्या रक्षाबंधन सोहळा आणि मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते त्यावेळी बीके उज्वला बहेनजी बोलत होत्या.सुरुवातीला सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
उपस्थित सर्व भावांबहिणांना राखी बांधण्याचा कार्यक्रम यशस्वी करत उज्वला बहेनजी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की जीवन सुंदर आणि तणावमुक्त जगण्यासाठी ध्यानधारणा (मेडीटेशन) आवश्यक असून जीवन जगत असताना जीवनात अनेकांना अनेक अडचणी येतात त्यावेळी स्वतःला दोष न देता समर्थपणे तोंड द्यावे.त्यावेळी ध्यानधारणा उपयोगी पडते.आपल्या जीवनाविषयी कोणाकडे तक्रारी करत जीवन जगू नका.जीवनाचा प्रवास खुप मोठा आहे सांगितले.
त्यानंतर अनिता बहेनजी यांनी श्रीकृष्णाच्या जीवनाबद्दल मनोगत व्यक्त करताना सांगितले की कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता या उक्तीप्रमाणे अनेकांना अनेक रुपात त्याचे दर्शन झाले.गोपिकांनी सर्वस्व मानून श्रीकृष्णाची भक्ती केली होती..त्यानंतर करकंब येथील उद्योजक अमोल दादा शेळके यांची कन्या श्रध्दा शेळके,धनश्री काटवटे आणि ज्ञानेश्वर दुधाणे यांचीही मनोगते करत त्यांच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल सन्मान करण्यात आला.
यावेळी ब्रह्माकुमारी परिवारातील अनेक साधक स्नेहा दुधाणे,अंजली टकले.विजया पवार ,सायली दुधाणे,मोठ्या संख्येने उपस्थित होते.

