अक्कलकोटला येणं ही माझ्यासाठी नेहमीच एक शांतीमय अनुभूती - अभिनेते अक्षय मुडावदकर
अक्कलकोट प्रतिनिधी श्रीशैल गवंडी तेज न्यूज
श्री स्वामी समर्थाच्या पावन भुमीत म्हणजेच अक्कलकोटला येणं ही माझ्यासाठी नेहमीच एक शांतीमय अनुभूती असते असे मनोगत श्री स्वामी समर्थ फेम कलाकार अक्षय मुडावदकर यांनी व्यक्त केले.
ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास भेट देवून श्री स्वामी समर्थाचे दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने चेअरमन महेश मालक इंगळे यांनी त्यांचे मंदिरात स्वागत करून श्री स्वामी समर्थाचे कृपावस्त्र, प्रसाद आणि स्वामींची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी अभिनेते अक्षय मुडावदकर बोलत होते.
पुढे बोलताना अक्षय मुडावदकर म्हणाले की श्री स्वामी समर्थ या मराठी मालिकेत मी स्वामी चरित्र साकारले, पण प्रत्यक्ष इथे वटवृक्ष मंदिरात आल्यानंतर जी ऊर्जा मिळते ती शब्दात सांगता येणार नाही. इथली भक्ती, स्वच्छता आणि शिस्तबद्ध कारभार पाहून खूप समाधान वाटते. चेअरमन महेश मालक इंगळे यांनी देवस्थानचा जो कायापालट केला आहे, भाविकांसाठी ज्या सुविधा निर्माण केल्या आहेत, ते खरोखरच कौतुकास्पद आहे.
स्वामींनी मला या भूमिकेसाठी निवडले आणि आज त्यांच्याच दरबारात माझा सन्मान होतोय, हा माझ्यासाठी स्वामींचाच आशीर्वाद आहे. श्री स्वामी समर्थ असेही मनोगत व्यक्त केले.
यावेळी मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, विपूल जाधव, श्रीकांत मलवे, सागर गोंडाळ, आदी सह भाविक भक्त उपस्थित होते.

