पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानात भर घालण्यासाठी विविध विषयांवर व्हॅल्यू एडिशन प्रोग्राम आयोजित करण्यात आला.
या उपक्रमांतर्गत द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी सर्व्हे व इंजिनिअरिंग जिओलॉजी, तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी काँक्रीट मिक्स डिझाईन व स्ट्रक्चरल हेल्थ मॉनिटरिंग, तसेच अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी युज ऑफ सायटेशन फॉर रिसर्च आणि रेवीट या विषयांवरील प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त व सक्रिय सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन साधने आणि उद्योगाभिमुख कौशल्यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमासाठी विविध विषयांचे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रा. चंद्रकांत देशमुख यांनी सर्व्हे, प्रा. मिलिंद तोंडसे यांनी इंजिनिअरिंग जिओलॉजी, प्रा. अजित करांडे यांनी काँक्रीट मिक्स डिझाईन, प्रा. अमोल कांबळे यांनी स्ट्रक्चरल हेल्थ मॉनिटरिंग, प्रा. गणेश लकडे यांनी युज ऑफ सायटेशन फॉर रिसर्च तर श्री. विक्रम वावरे यांनी रेवीट या विषयांवर प्रशिक्षण व मार्गदर्शन केले.
याप्रसंगी विभागप्रमुख डॉ. यशवंत पवार यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करताना आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन पद्धती आणि कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांचा लाभ घेऊन उद्योग व संशोधन क्षेत्रातील आव्हानांसाठी स्वतःला सक्षम बनवावे, असे आवाहन त्यांनी केले.

