म्हसवड प्रतिनिधी विजय टाकणे तेज न्यूज
सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या दिंडी चे प्रस्थान दिनांक 19 रोजी श्री क्षेत्र गोंदवले येथून होणार आहे 19 रोजी सायंकाळी म्हसवड येथील हरि ओम मंगल कार्यालय येथे दिंडी मुक्काम असणार असून पहाटे पाच वाजता पादुकांचं अभिषेक होऊन सात वाजता म्हसवड येथून 20 रोजी दिंडी पंढरपूर कडे मार्गस्थ होणार आहे.
दिनांक 20 रोजी पालखीचा मुक्काम पिलीव येथे होणार असून येथे महाराजांच्या पादुकांचे पूजन आरती होऊन 21 रोजी दिंडी भाळवणी कडे मार्गस्थ होईल. दिंडी मुक्काम भाळवणी येथे होणार आहे.
22 रोजी सकाळी दिंडी मार्गस्थ होईल. रात्री मुक्काम वाखरी येथून सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मठ, इसबावी पंढरपूर येथे होणार आहे.पंढरपूर येथे विश्रांती होऊन 26 रोजी परती चा प्रवास करून पुन्हा गोंदवले येथे येणार आहे.

