पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आषाढी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, मोरोची येथे उभारण्यात आलेल्या स्वागत कक्षात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते दिंडी प्रमुखांना प्रथमोपचार किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली परतरावर यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी व मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित होते. पालकमंत्री गोरे यांनी आरोग्य केंद्रातील सोयी-सुविधांची पाहणी करून डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना २४ तास सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या.
आषाढी वारी कालावधीत वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पालखी मार्गावर फिरते वैद्यकीय पथक, रुग्णवाहिका, तात्पुरते उपचार केंद्र व औषधसाठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोणत्याही वारकऱ्याला आरोग्यविषयक अडचण आल्यास तात्काळ सेवा मिळावी, यासाठी प्रशासनाने नियोजन केले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

