पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त वारकरी भाविकांच्या सेवेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) उद्योग-व्यापार विभाग तसेच एमपी ग्रुप ऑफ कंपनीस यांच्या संयुक्त विद्यमाने कोर्टी येथील फाटे ट्रॅक्टर शोरूम येथे फराळ वाटपाचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी भाविकांना नागेश एकनाथ फाटे यांच्या हस्ते फराळ वाटप करण्यात आले.
आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक असून, वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठल सेवा मानत हा उपक्रम राबविण्यात आल्याचे याप्रसंगी नागेश फाटे यांनी सांगितले.
यावेळी संजय पवार, शरदचंद्र चट्टे, रमेश फाटे, अभिमन्यू पवार, उमेश फाटे, औदुंबर माने, ओंकार फाटे, शुभम फाटे, शर्विन फाटे, शशांक फाटे, समाधान बागल, समाधान कांबळे, लखन मोरे, ऋषिकेश बागल, वाशिम मुलानी, निवृत्ती पाटील, सावंत काका (पुणे), ठाण्याचे उद्योजक रवींद्र पाटील, पवन पवार तसेच एमपी ग्रुप ऑफ कंपनीसचा सर्व स्टाफ, ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने वारकरी भाविक उपस्थित होते.
आषाढी एकादशी निमित्त वारकरी भाविकांचे आयोजकांनी स्वागत करून त्यांना फराळाचे वाटप केले. या सेवाभावी उपक्रमाबद्दल वारकरी भाविकांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले. आषाढी वारीत समाजसेवेची परंपरा जपत वारकऱ्यांच्या सेवेसाठी अशा उपक्रमांचे आयोजन होत असल्याने सामाजिक बांधिलकीचा संदेशही या माध्यमातून देण्यात आला.


