भारतीय क्रीडा प्राधिकरण चे प्रादेशिक संचालक पांडुरंग चाटे यांच्या हस्ते सायकल दिंडीचा पंढरपुरात शुभारंभ
राज्यासह कर्नाटकातून निघालेली सायकल दिंडी पंढरपुरात विसावली
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 25 जुलै 2026 रोजी होणार असून, या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून अनेक दिंड्या विविध पालखी सोहळ्यासोबत आषाढी यात्रा सोहळ्यासाठी पंढरपूरकडे येत आहेत. अशातच महाराष्ट्र व कर्नाटकातून 4 हजार सायकल्सची दिंडी पंढरपुरात येऊन पोहोचली आहे. पंढरपुरात आज सायकल संमेलन पार पडले. यावेळी सायकल स्वारांनी वारकरी परंपरेप्रमाणे सायकल वरून नगरप्रदक्षणा केली. भारतीय क्रीडा प्राधिकरण चे संचालक पांडुरंग चाटे व आषाढी पंढरपूर सायकलवारी असोसिएशनचे अध्यक्ष उमेश परिचारक यांनी सायकल दिंडीचे उद्घाटन करून दिंडीत सहभाग घेतला
फिट इंडिया या राष्ट्रीय कार्यक्रम अंतर्गत या दिंडीमध्ये सायकल सारख्या व्यायामाचे महत्व पटवून देण्यात आले. जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. सायकलिंग हा आरोग्यदायी, पर्यावरणपूरक व किफायतशीर वाहतुकीचा पर्याय असून नियमित सायकल वापरामुळे शारीरिक तंदुरुस्ती राखण्यास मदत होते, असा संदेश या वेळी देण्यात आला.राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या सायकल स्वारांमुळे आज पंढरी नगरी वेगळ्याच आध्यात्मिक वातावरणात सामावून गेलेली पहायला मिळाली.
यावेळी पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगोटे पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी बैजल, राजेंद्र वानखेडे एडवोकेट श्रीनिवास वायकर रवींद्र दुसाने नाईक, अभिजीत कुलकर्णी प्रकाश शेटे महेश भोसले यांच्यासह पंढरपूर सायकलर्स क्लब व नाशिक सायकल क्लब आणि बारामती सायकल क्लब यांनी अतिशय चांगल्या प्रकारची नियोजन केले होते.

