पंढरपुर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर येथील निशिगंधा बँकेची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन् आर. बी. जाधव होते यावेळी सभासदांना ९ टक्के जाहीर करण्यात आला गत सोळा वर्षात बँकेने सभासद व ठेवीदारांची विश्वासार्हता जपत कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली समाधानकारक प्रगती केली आहे.
बँकेच्या डिजिटल बैंकिंग सुविधांमध्ये आणखी एक महत्वपुर्ण पाऊल म्हणून मान्यवरांच्या हस्ते बँकेच्या मोबाईल अॅप व डेबीट (एटीएम) कार्डचे उध्दाटन यावेळी करण्यात आले. या माध्यमातून सभासद व ग्राहकांना आपल्या मोबाईलवरून विविध बँकिंग सेवा अधिक सुलभ व सुरक्षितपणे वापरता येणार आहेत. बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून ग्राहकांना अधिक गतिमान व सुविधाजनक बँकिंग सेवा देण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी बँकेचे मार्गदर्शक व संचालक कल्याणराव काळे यांनी गेल्या सोळा वर्षांत बँकेने केलेल्या प्रगतीचा आढावा सभासदांसमोर ठेवला आणि लवकरच बँकेची स्वमालकिची इमारत उभी करण्याची ग्वाही सभासदांना देण्यात आली. सभासदांचा विश्वास ग्राहकांचे सहकार्य आणि अधिकारी, कर्मचारी वर्गाच्या मेहनतीच्या जोरावर बँकेला भविष्यात अधिक सक्षम, आधुनिक, पारदर्शक व सभासदाभिमुख बैंक म्हणून पुढे नेण्यासाठी संचालक मंडळ कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी व्हा. चेअरमन् सतिश लाड, संचालक देविदास सावंत, बी. बी. सावंत, डॉ. मंदार सोनवणे, भागवत चवरे, वैभव साळुंखे, महेश पटवर्धन, अनिल निकते संचालिका अॅड. सौ. क्रांती कदम, सौ. शोभा येडगे उपस्थित होते यावेळी "आदर्श सभासद" म्हणून सौ. जया पाटील, हर्षदीप इंगोले, सुधाकर गायकवाड, सुनिल काळे, दिपक सुरवसे, सौ. सविता कवडे, मनोहर सरदेशमुख, तुकाराम अवताडे, उध्दव लबडे व बळीराम चौगुले-ढोले या मान्यवरांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व तुळशिचे रोप देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
सभेच्या पुर्वी एक तास सभासदांसाठी आयोजित केलेल्या "सभासद प्रशिक्षण" वर्गामध्ये सातारा येथील सायबर तज्ञ हेमंत देशमुख यांनी सायबर गुन्हे आणि त्यासाठी घ्यावयाची काळजी, याबाबतची सखोल माहिती यावेळी उपस्थितांना दिली.
निशिगंधा सहकारी बँकेच्या सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षातील कामकाजाचा आढावा घेताना कल्याणराव काळे म्हणाले कि, मार्च २०२६ अखेर बँकेचे ४९११ सभासद असून बँकेकडे रू. ४७.१६ कोटींच्या ठेवी असून, रू.२५.७९ कोटींचे कर्जवाटप केलेले आहे व रू.१७.५८ कोटींची गुंतवणूक केली आहे. चालू अर्थिक वर्षात बँकेस रू.४८.६४ लाख रूपयांचा नफा झालेला आहे. बँकेच्या या अर्थिक कामगिरीबद्दल सभासदांनी समाधान व्यक्त केले.सभेच्या सुरूवातीस श्री विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन सर्व संचालकांच्या हस्ते करण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिर्के यांनी विषयपत्रिकेवरील विषयांचे वाचन केले, त्यास सभासदांनी आवाजी मतदानाने मंजूरी दिली सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देण्यात आली.
यावेळी अहवाल सालातील दिवंगत सभासद, ठेवीदार, हितचिंतक यांना श्रध्दांजली वाहण्यात आली सभेस डॉ राजेंद्र जाधव, यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे, स.शि.व. का. सह. साखर कारखान्याचे संचालक आण्णा शिंदे, संजीव अभ्यंकर, धनंजय कुलकर्णी, सकाळ चे दत्तात्रय येडगे, अर्जुन जाधव, लाला शेख, नितीन देवकर, आदि बहुसंख्येने उपस्थित होते. संचालक महेश पटवर्धन यांनी उपस्थितांचे मानले.

