पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर यात्रेतील तात्पुरत्या बसस्थानकापासून शहरात जाणे येण्यासाठी भाविकांची माफक दरात सोय करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने परिवहन मंत्री ना.श्री प्रताप सरनाईक यांच्याकडे समक्ष केल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली. आषाढी यात्रा तयारीचा आढावा घेण्यासाठी मंत्रीमहोदय पंढरपूर येथे आले होते.
आषाढी यात्रा कालावधीत पंढरपूर परिसरातील विविध मार्गावर एसटी महामंडळाकडून *भीमा,विठ्ठल,पांडुरंग* अशी तात्पुरती बसस्थानके उभारण्यात येतात.तेथे आवश्यक त्या सुविधा असाव्यात.याबाबत त्यांना निवेदन देण्यात आले. त्यामध्ये शहरापासून बसस्थानकाचे अंतर सुमारे आठ ते दहा कि. मि.असते तेथुन शहरातील निवासस्थानी येण्यासाठी व परत बसस्थानकावर जाण्यासाठी माफक दरातील वाहनांची कोणतीही सोय उपलब्ध नाही,अवाजवी भाड्याची मागणी करण्यात येते त्यामुळे भाविकांची लूट होते.आपण परिवहन मंत्री असल्याने बसस्थानक ते शहरातील महत्त्वाची ठिकाणे यांचे अंतर व भाडे निश्चित करुन तसे फलक तात्पुरत्या सर्व बसस्थानकावर लावण्यात यावेत.
तसेच पिण्यासाठी शुद्ध पाण्याची सोय बंदिस्त टाकीमधून करून त्यासाठी नळ बसविण्यात यावेत. स्थानक परिसरात व स्वच्छता गृह परिसरात भरपूर प्रकाश व्यवस्था करण्यात यावी.फलाटांचे व इतर सुचना फलक मोठ्या अक्षरातील असावेत.विविध बस स्थानकावरून सुटणाऱ्या विभाग निहाय जिल्ह्याची माहिती सर्व बस स्थानकावर एकत्रित लावण्यात यावी.
सर्व बसस्थानकावर एकापेक्षा अधिक माहिती/मार्गदर्शन केंद्र असावीत. पंढरपूरच्या मुख्य बसस्थानकावरील स्वच्छता गृहात मोफत सेवा उपलब्ध करावी.
अशा प्रकारच्या सुचना, मागणी ग्राहक पंचायतीचे जिल्हा सचिव सुहास निकते,जिल्हा उपाध्यक्ष विनय उपाध्ये,तालुका अध्यक्ष नंदकुमार देशपांडे,उपाध्यक्ष प्रशांत माळवदे,तालुका सदस्य इंद्रजित फडे,अमोल अभंगराव,सुमित पारखे,इ.च्या शिष्टमंडळाने मंत्र्यांना समक्ष भेटुन केली आहे.

