सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 D-1 च्या 2026-27 वर्षाकरिता प्रांतपालपदी अभ्यासू व्यक्तिमत्वाचे, उपक्रमशील लायन राजेंद्र शहा-कासवा यांची निवड करण्यात आली. तर रिजन-1 च्या विभागीय सभापतीपदी उच्च विद्या विभूषित डॉ. लायन महेश नळे व सचिव पदी लायन गंगाप्रसाद बंडेवार यांची निवड करण्यात आली.
तसेच उपविभागीय सभापतीपदी लायन अमिता कारंडे,लायन प्रा. स्वामीनाथ कलशेट्टी सर, लायन अर्चना आवटे,व लायन उन्मेश आटपाडीकर यांचीही निवड करण्यात आली. याशिवाय वर्षभर चालणाऱ्या विविध कार्यक्रमासाठी कॅबिनेट ऑफिसर्स म्हणून अनेक पदाधिकाऱ्यांची ही निवड याप्रसंगी करण्यात आले.
लायन्स इंटरनॅशनल वर्षे 2026- 27 करिता सेवेतून संतुष्टी हे ब्रीद समोर ठेवून रंजन उपक्रमाद्वारे जिथे मानवतेचा स्पर्श तिथेच खऱ्या सेवेला अध्यात्माची दिशा मिळते हा उदात्त्य हेतू समोर ठेवून लायन्स क्लब वर्षभराचं सुयोग्य नियोजन करून विविध क्षेत्रात सेवा हीच सर्वोच्च साधना म्हणून कार्य करणार आहे.
लायन्सच्या डिस्ट्रिक्ट 3234 D-1 रिजन -1 मधील एकूण चार उपविभाग अक्कलकोट, सोलापूर, बार्शी,पंढरपूर व सांगोला येथील क्लब च्या वतीने या पुढील वर्षभरात विविध क्षेत्रात क्लबचे अध्यक्ष,सचिव, कोषाध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व लायन्स सदस्य समाजाच्या विविध क्षेत्रातील सेवाकार्यात तन- मन- धनाने कार्यरत राहणार आहे.अशी माहिती उपविभाग-2 उपविभागीय सभापती लायन प्रा.स्वामीनाथ कलशेट्टी यांनी दिले


