पंढरपूर येथे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील तालुका निरीक्षकांच्या निवडी जाहीर
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्ह्यात नूतन जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय पदाधिकारी निवडीसाठी तालुका निरीक्षकांच्या निवडी शनिवारी पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख, कार्याध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या.
यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उद्योग, व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्यावर माळशिरस आणि उत्तर सोलापूर तालुक्याच्या निरीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली.
यावेळी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सागर पडगळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष दीपक वाडदेकर ,राज्य प्रवक्ते महादेव तळेकर, राज्य उपाध्यक्ष हरिदास रणदिवे, राज्य महिला उपाध्यक्ष कोमलताई ढोबळे, महिला जिल्हाध्यक्ष पल्लवी पाटील, मृदुला तळेकर, विनंती कुलकर्णी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेख, जिल्हा उपाध्यक्ष सौदागर जाधव, युवती अध्यक्ष विश्रांती कुलकर्णी, पंढरपूर तालुका अध्यक्ष अतुल चव्हाण, यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील पक्षातील सर्व तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष , फ्रंटल व सेलचे सर्व जिल्हाध्यक्ष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून सोलापूर जिल्ह्यात आपला दबदबा कायम ठेवून पुढील काळात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यासाठी पक्षातील अनुभवी नेतेमंडळींना पक्ष निरीक्षक पदाची जबाबदारी घेण्यात आली आहे.
पक्ष निरीक्षकाच्या माध्यमातून तालुकास्तरावर बैठका घेऊन पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या जाणार आहेत. यामध्ये शेवटच्या कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून आगामी काळात तालुका पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे.


