पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
दिनांक ०३/०५/२०२६ रोजी मl प्रशांत डगळे, सहा. पोलीस अधिक्षक (भा.पो.से) पंढरपूर विभाग, यांना बालकल्याण समिती अध्यक्ष समीर सय्यद यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे पंढरपूर तालुका हद्दीत एक बालविवाह होत असल्याचे बातमी मिळाल्याने निर्भया पथक पंढरपूर यांनी सदर ठिकाणी तात्काळ जावुन चौकशी केली.
सुरुवातीला मुलीचे नातेवाईकांनी मुलगीचे वय १८ वर्षे पुर्ण आहे तिची बारावी होवून खुप वर्षे झाले असे सांगितले, मात्र निर्भया पथकाने चौकशी करुन ती शिकत असलेल्या शाळेतुन तिचे बोनाफाईड प्रमाणपत्र घवून आले असता तिचे वय हे १७ वर्षे ५ महीने दिसुन आले. व त्यानंतर तो होणारा विवाह तिचे आई वडीलांना समज देवुन तत्काळ रोखण्यात आलेला आहे. व त्या अल्पवयीन मुलीस बालकल्याण समिती, सोलापूर यांचेसमक्ष पुढील कार्यवाहीकरीता हजर करण्यात आले.
तसेच निर्भया पथक, पंढरपूर विभाग, पंढरपूर यांनी पंढरपूर शहर, पंढरपूर तालुका, पंढरपूर ग्रामीण तसेच करकंब पोलीस ठाणे हद्दीतील सर्व जनतेला आवाहन केले आहे की, आपले हद्दीमध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये अशा प्रकारचे बालविवाह होत असल्यास आम्हास, निर्भया पथकास संपर्क करावा (९११२२२६३५२) व यापुढे कोणी अशा प्रकारचे बेकायदेशीर कृत्य करेल अशा लोकांवर प्रचलित कायद्यानुसार अत्यंत कडक कारवाई केली जाईल. तसेच अशा लोकांची गय केली जाणार नाही असे सांगितले आहे.
सदरची कारवाई अतुल कुलकर्णी, पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण, प्रितम यावलकर , अप्पर पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण, प्रशांत डगळे, सहा. पोलीस अधिक्षक (भा.पो.से) पंढरपूर विभाग, पोलीस निरिक्षक तय्यब मुजावर पंढरपूर तालुका यांचे मार्गदर्शनाखाली निर्भया पथक प्रमुख म. पोलीस उपनिरीक्षक / सुप्रिया यादव/रावण, म. पोकॉ/१३११ वाघमारे, पोकॉ/१२३६ सावंत, म. पोकॉ/२०४८ काझी, पंढरपूर तालुका पो.स्टे. नेमणुकिस असलेले पोहेका १७९२ भोसले यांनी पार पाडलेली आहे.


