पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
१ मे महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित पंचायत समिती कार्यालय पंढरपूर समोरील प्रांगणात सभापती डॉ. शुभम आगावणे हस्ते तर उपसभापती प्रमोद देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण समारंभ पार पडला.
यावेळी गटविकास अधिकारी अमोल जाधव , सह गटविकास अधिकारी अरुण भुजबळ , जि.प.सदस्य , पंचायत समिती सदस्य विजय शिंदे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

