पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आदमापूर येथील प्रसिध्द बाळु मामा ची भाकणूक (भविष्य वाणी) करण्याचा मान असणारे गुरू माऊली कृष्णा डोणे महाराज यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.
त्यावेळी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती सदस्य व शिवसेना जिल्हाप्रमुख पंढरपूर विभाग संभाजी शिंदे व मंदिरे समिती कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी ढोणे महाराज म्हणाले की वर्षातून एकदा पांडुरंगा चे दर्शन घेतल्याने मनात एक वेगळीच ऊर्जा मिळते.आणि आमचे सहकारी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सदस्य संभाजीराजे यांचे कायम सहकार्य असते. त्यांच्या हातून पांडुरंगाची सेवा घडत राहो. असे ढोणे महाराज म्हणाले.


