भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम
भारतीय जनता पार्टी उत्तर मुंबई व्दारा महाराष्ट्र दिन, कामगार दिन,व बुध्दि पौर्णिमा आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.१ में २०२६ रोजी सकाळी १० वाजता कांदिवली पश्चिम येथील भारतीय जनता पार्टी उत्तर मुंबई जिल्हा कार्यालय लोककल्याण कार्यालय,बालासिनोर सोसायटी कांदिवली पश्चिम येथे संपन्न झाला.
यावेळी उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष व नगरसेवक बाळा तावडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलन करण्यात आले," जय जय महाराष्ट्र माझा" हे महाराष्ट्र गीत सामुहिक पणे गायले गेले, जिल्हा अध्यक्ष व नगरसेवक बाळा तावडे यांनी यावेळी महाराष्ट्र दिन, कामगार दिन,व गौतम बुद्ध यांच्या विषयी माहिती सांगितली.महाराष्ट्र राज्यातील भारतीय जनता पार्टी अनेक कार्यान्वित असलेल्या योजनाची माहिती दिली.
यावेळी मा.खासदार गोपाळ शेट्टी, बाळा तावडे,बाबासिंग, मा.नगरसेवक कमलेश यादव,निखिल व्यास, गिरीधर साळुंखे, योगेश पडवळ, रेश्मा टक्के, सुलभा जोशी, पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके,व भारतीय जनता पार्टी चे महिला व पुरुष पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

