पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर (स्वायत्त) येथील शैक्षणिक वर्ष २०१९–२० ते २०२१–२२ या कालावधीत प्रवेश घेतलेल्या N+2 बाधित विद्यार्थ्यांना कोविड-१९ महामारीमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीचा मोठा फटका बसला होता. तसेच वेळोवेळी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित झाले व काहींना आपले अभ्यासक्रम पूर्ण करता आले नाहीत.
या पार्श्वभूमीवर, ज्या N+2 बाधित विद्यार्थ्यांना आपला अभ्यासक्रम पूर्ण करता आलेला नाही, अशा विद्यार्थ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्याकडील परिपत्रक क्र. पुअहोसोविसो/अभ्यासमंडळे/२०२६/३८३३, दिनांक २८ एप्रिल २०२६ अन्वये अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विशेष परीक्षा संधी (Special Chance) देण्यात आलेली आहे.
या निर्णयामुळे कोविड काळात शैक्षणिक नुकसान झालेल्या N+2 बाधित विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांना आपले शैक्षणिक भविष्य पूर्ण करण्याची नवी संधी प्राप्त होणार आहे.
परीक्षा अर्ज (Exam Form) भरण्याबाबतची सविस्तर माहिती महाविद्यालयाच्या परीक्षा विभागामार्फत लवकरच स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती महाविद्यालय प्रशासनाने दिली आहे. तरी संबंधित विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या परीक्षा विभागाशी दि. १५ मे पर्यंत संपर्क साधावा.
ही सुविधा विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार लागू करण्यात येत असून पात्र N+2 बाधित विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ बी. टी. जाधव यांनी केले आहे.

