पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर जिल्ह्यामध्ये अवैद्य वाळू धंदे याच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी असा इशारा आदिवासी महादेव कोळी जमात सामाजिक संघटना पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा दुर्गा माने यांनी निवेदन दिले आहे.
पंढरपूर तालुका येथे ग्रामीण भागातील चळे, आंबे, मुंडेवाडी आजनसोंड व चंद्रभागा भीमा नदी व मोठ्याळ तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर या ठिकाणी दिवस-रात्र वाळू उपसा चालू आहे.याच्यावर कारवाई करण्यात यावी असे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.
सदरच्या अवैध वाळू उपसावर कारवाई न केल्यास सोलापूर जिल्हाधिकारी कार्यलया समोर आत्मदहन करणार असल्याचे दुर्गा माने निवेदनात म्हटले आहे.
यावेळी दुर्गा माने म्हणाल्या की याला जबाबदार कोण ? सर्व वाळू ठेकेदार बोलतात आम्ही हप्ते देतो तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यलया, पोलीस स्टेशन प्रत्येक ठिकाणी आमचे हप्ते पोहोचतात ते काही आमचं वाकड करू शकत नाहीत. असे ते सरळ मला दम देतात त्यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे. असे दुर्गा माने यांनी सांगितले.

