पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त स्विमींग ग्रुपच्या वतीने अभिवादन केल्यानंतर संस्थापक महेश मालक इंगळे यांनी व्यक्त केले मनोगत.
अक्कलकोट प्रतिनिधी श्रीशैल गवंडी तेज न्यूज
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी १८ व्या शतकात स्त्री असूनही अतिशय कुशलतेने राज्यकारभार केला. काशी, गया, सोमनाथ, द्वारका, अयोध्या, ओंकारेश्वर यांसारख्या देशभरातील शेकडो मंदिरांचा जीर्णोद्धार, घाट, विहिरी, धर्मशाळा बांधून त्यांनी धर्माशी असलेली बांधिलकी जपली. शेतकऱ्यांना न्याय देणारी महसूल पद्धत, उद्योगधंद्यांना प्रोत्साहन आणि प्रजाहितदक्ष कारभारामुळे त्यांचे स्थान आजही जनमानसात लोकमाता म्हणून प्रचलीत आहे म्हणून आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त भारतातील सर्वानी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कर्तृत्वाचा जागर करावा असे मनोगत येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक व स्विमींग ग्रुपचे संस्थापक महेश इंगळे यांनी व्यक्त केले.
आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त स्विमींग ग्रुपच्या वतीने संस्थापक महेश इंगळे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी नगरसेवक महेश इंगळे बोलत होते.
पुढे बोलताना नगरसेवक महेश इंगळे म्हणाले की अहिल्याबाईंचे जीवन हे त्याग, कर्तव्यनिष्ठा आणि स्त्री शक्तीचे मूर्तिमंत उदाहरण आहे. आजच्या काळात त्यांनी बांधलेली मंदिरे आजही आपल्या संस्कृतीचे रक्षण करत आहेत. त्यांच्या कार्याचं उदाहरण अनेक पिढ्यांसाठी एक प्रेरणास्रोत आहे असेही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची सांगता अहिल्या बाईंच्या प्रतिमेसमोर सामूहिक पसायदानाने झाली. यावेळी प्रथमेश मालक मालक इंगळे, संतोष पराणे, कल्याणी गंगोडा सर, विद्याधर गुरव सर, रमेश शिंदे सर, श्रीकांत झिपरे, बाळासाहेब एकबोटे, बाबा सुरवसे,
मनोज जगताप सर, ओमकार उटगे, विश्वनाथ देवरमनी सर, शिवशरण अचलेर सर, अशोक कलशेट्टी सर, अंकुश केत, बाळासाहेब एकबोटे, सुनील पवार, ज्ञानेश्वर भोसले, कुमार हत्तुरे, रमेश कणमुसे, सचिन किरनळी, अमर पाटील, आदित्य गवंडी, तन्मय इचगे, समर्थ भोसले, अमोल महाडिक, तुषार मोरे, समर्थ स्वामी, सागर गोंडाळ, मनोज इंगोले, अमोल माने, शेखर आडवीतोटे आदीसह महेश मालक व प्रथमेश मालक इंगळे मित्रपरिवार व स्विमिंग ग्रुप सदस्य उपस्थित होते.

