पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून परमस्नेही मित्र श्रीकांत यादव यांची नुकतीच नियुक्ती झाल्याबद्दल एल आय सी चे विकास अधिकारी बी एस चौगुले व रणजित जगताप यांच्या वतीने करण्यात आला.
या नियुक्तीबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी चौगुले म्हणाले की श्रीकांत यादव यांच्या प्रशासकीय अनुभवाचा आणि कार्यक्षम नेतृत्वाचा मंदिर समितीच्या कामकाजाला निश्चितच लाभ होईल, तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या सेवेत त्यांच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य घडेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी प्रार्थना करून श्रीकांत यादव यांना त्यांच्या नव्या जबाबदारीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

