म्हसवड प्रतिनिधी सचिन सरतापे तेज न्यूज
म्हसवड येथील मायणी चौक, कोर्टासमोर, सातारा-पंढरपूर महामार्गावरील 414 Premium Detailing Studio चा भव्य उद्घाटन सोहळा आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. लोकनियुक्त नगराध्यक्षा पूजा सचिन वीरकर यांच्या शुभहस्ते स्टुडिओचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कुमार सरतापे यांनी बुद्धवंदना घेऊन कार्यक्रमाला सुरुवात केली. यावेळी उपनगराध्यक्षा श्रीदेवी पिसे, क्रांतिवीर संकुलाचे संस्थापक अध्यक्ष विश्वबर बाबर, अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन नितीनभाई दोशी, माजी सभापती बाळासाहेब रणपिसे, अरविंद बनसोडे, संपादक लिंगराज साखरे, माण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश बुधावले, संपादक बापूसाहेब मिसाळ, तेज न्यूजचे संपादक प्रशांत माळवदे, परेश व्होरा, म्हसवड प्रेस क्लबचे अध्यक्ष महेश कांबळे, पत्रकार प्रवीण राजे, पत्रकार नवनाथ भिसे, ॲड. राजू भोसले, पत्रकार शहाजी लोखंडे,सिद्धार्थ बनसोडे, अमित मुल्ला, विनोद रसाळ, प्रदीप तावरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी 414 Premium Detailing Studio च्या संचालक द्विज सचिन सरतापे यांना शुभेच्छा देत व्यवसायाच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. वाहनांच्या सौंदर्यवर्धनासाठी अत्याधुनिक सुविधा, PPF, Ceramic Coating, Paint Correction, Interior Deep Cleaning यांसारख्या आधुनिक सेवा ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
उद्घाटन सोहळ्यास नागरिक, मित्रपरिवार, पत्रकार व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
414 Premium Detailing Studio च्या या भव्य उद्घाटनामुळे वाहन डिटेलिंग क्षेत्रात एक नवीन पर्व सुरू झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. संचालक द्विज सचिन सरतापे यांनी उपस्थित सर्व मान्यवर, नागरिक व शुभेच्छुकांचे आभार मानले.


