एकूण 8 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे तेज न्यूज
पंढरपूर तालुका पोलिसांच्या वतीने डिझेल चोरी करणाऱ्या टोळीवर धडक कारवाई करण्यात आली आहे. एकीकडे इंधन तुटवडा असताना दुसरीकडे डिझेलची चोरी होत असल्याची बाब समोर आली आहे
याबाबतची सविस्तर माहिती अशी की दिनांक 26 मे रोजी रात्री पहाटे दोनच्या सुमारास तुंगत गावातील विशाल भोसले यांचे 10 चाकी ट्रक मधून 1 जण ब्रीजा गाडीमध्ये डिझेलचे ड्रम ठेवून दुसरे 2 जण फायबरच्या पाईपच्या साह्याने ट्रक मधून डिझेल चोरी करून तीन ड्रम डिझेल चोरी करत असल्याचे उघडकीस आले.
त्यानंतर ट्रकचे मालक विशाल भोसले यांना संशय आल्यानंतर त्यांनी ब्रिझा गाडीचा पाठलाग केला. त्याच्यानंतर ती गाडी गुरसाळे बायपासला आल्यानंतर त्या ठिकाणी समाधान गुटाळ यांच्या हॉटेल समोर असलेल्या गाडीच्या बाजूला ती गाडी लावून त्या ठिकाणी देखील ब्रिजा गाडीमधून दोघेजण खाली उतरून एक जण प्लास्टिकची पाईप तेथील ट्रकच्या टाकीला लावून टाकीतून डिझेलची चोरी करत असताना आढळून आला. दरम्यान आरडाओरडा केल्याने घटनास्थळावरून दोघे आरोपी पळून गेले दरम्यान एका व्यक्तीला स्थानिक नागरिकांनी पाठलाग करून पकडले व घडलेल्या घटनेबाबत पंढरपूर तालुका पोलिसांना याची माहिती दिली.
दरम्यान पंढरपूर तालुका पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन चोरी केलेले डिझेल ब्रिझा कार व 3 मोबाईल फोन असा एकूण तीन ड्रम डिझेलसह मुद्देमाल एकूण किंमत रुपये 8 लाख 35000 रुपये किंमतीचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून ताब्यात घेतलेला आहे.
आरोपी दत्तात्रय महारुद्र लोहार राहणार मोहोळ तालुका मोहोळ याचे विरुद्ध व त्याचे इतर 2 साथीदार यांच्या विरुद्ध बीएनएस ऍक्ट कलम 303 प्रमाणे डिझेल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी दत्तात्रय महारुद्र लोहार यांना सदर चोरीच्या तपासकामी ताब्यात घेण्यात आलेले आहे व इतर पळून गेलेल्या दोन आरोपींचा पंढरपूर तालुका पोलीस शोध घेत आहेत. इतर दोन आरोपींना शोधण्याकरिता विविध पथके रवाना करण्यात आलेली आहे.
मागील दोन महिन्यात तुंगत गुरसाळे रोडवर डिझेल चोरीच्या अनेक घटना घडलेल्या होत्या. त्या बाबतीमध्ये सदर कारवाईतून आणखीन डिझेल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे , सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, शहाजी गोसावी, पोलीस उपनिरीक्षक विक्रम वढणे, भारत भोसले, दत्तात्रय तोंडले, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजू गायकवाड, पोलीस हवालदार जाडकर, नितीन चौरे, सुजित उबाळे, पोलीस हवालदार साळुंखे, संजय गुटाळ, मंगेश रोकडे, पोलीस हवालदार योगीराज खिलारे, सुहास देशमुख, दीपक भोसले, अभिमन्यू गरड, यांच्या पथकाने केली आहे.


